ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १५ - भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशातील वाराणसी या सुरक्षित समजल्या जाणा-या मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
शनिवारी रात्री भाजपाच्यावतीने उमेदवारी घोषित करण्यात आली असून यामध्ये मोदी यांच्यासोबतच भाजपात दाखल झालेले दलित नेते उदीत राज यांना दक्षिण पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजपाच्यावतीने उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीतील भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉु. हर्षवर्धन यांना चांदनी चौक या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी लेखी यांना नवी दिल्ली, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांना लखनऊ तर अभिनेत्री किरण खेर यांना चंदीगडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली असल्याची घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे.
from Lokmat Marathi News : Main-Main (मुख्य-मुख्य) http://ift.tt/1kvliiv

No comments:
Post a Comment