- फ्रान्सिस दिब्रिटो
एखादी लोकोत्तर व्यक्ती अधिकारपदावर आरूढ झाली, तर ती जगडव्याळ संस्थेलाही दिशा देऊ शकते आणि इतिहासाला वळण लावू शकते. अशी किमया करीत आहेत सव्वाशे कोटी कॅथलिक ख्रिश्चनांचे जगद्गुरू पोप फ्रान्सिस. गेल्या मार्चमध्ये कॅथलिक धर्मपीठाचे जगद्गुरू म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतली. वर्षभरात त्यांनी आपली उक्ती व कृती याद्वारे चर्चला व जगाला मूलभूत संदेश दिला आहे. त्यानिमित्ताने..
अत्युच्चपदी थोरहि बिघडतो हा बोल आहे खरा,’ असे कवीने म्हटले आहे. मात्र, अशक्यप्राय वाटणारी स्वप्ने अंत:करणात घेऊन, नि:स्पृहतेची कवचकुंडले धारण केलेली एखादी लोकोत्तर व्यक्ती अधिकारपदावर आरूढ झाली, तर ती जगडव्याळ संस्थेलाही दिशा देऊ शकते आणि इतिहासाला वळण लावू शकते. अशी किमया करीत आहेत सव्वाशे कोटी कॅथलिक ख्रिश्चनांचे जगद्गुरू पोप फ्रान्सिस.
एरवी कॅथलिक चर्चचे प्रमुख असलेले पोप आमरण आपल्या पदावर असतात. गतवर्षी पोप सहावे बेनेडिक्ट यांनी अचानकपणे आपल्या पदाचा त्याग केला आणि सर्व जगाला आश्चर्यचकित केले. प्रकृती साथ देत नसताना, पदाला चिकटून राहणे त्यांच्या मनाला पटले नाही. दोन हजार वर्षांची परंपरा बाजूला सारून पोप बेनेडिक्ट पायउतार झाले. सर्व स्तरांवरील नेतृत्वासाठी तो एक आदर्श होता. नव्या पोपची निवड करण्यासाठी जगातील ११५ कार्डिनल्स (उच्च पदस्थ कॅथलिक धर्माधिकारी) व्हॅटिकनला गोळा झाले. गुप्त मतदान पद्धतीने त्यांनी लॅटिन अमेरिकेतील अज्रेंटिना या गरीब देशातील कार्डिनल जॉर्ज (होरके) बेर्गोलियो यांची नवे पोप म्हणून निवड केली. दक्षिण गोलार्धातील ते पहिले पोप होत. त्यांनी ‘फ्रान्सिस’ हे नाव धारण केले. फ्रान्सिस या नावात खूप काही आहे. ते नाव आहे १३ व्या शतकातील फ्रान्सिस नावाच्या इटालियन संताचे. कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्या ऐश्वर्याचा त्याग केला व ते बनले नि:संग संन्याशी. नावाच्या निवडीपासून सांप्रत पोपनी अनेक अभिनव पायंडे पाडण्यास प्रारंभ केला आहे.
आपण पोप झालो म्हणजे आपले हात आकाशाला लागले नाहीत, आपल्या रथाचा जमिनीबरोबरचा संपर्क तुटला नाही आणि आपण वलयांकित झालो नाही. आपण सिद्ध नसून साधक आहोत, असा संदेश पोप फ्रान्सिस आपल्या निवडीच्या पहिल्या क्षणापासून देत आहेत. गेली दोन सहस्रके चर्चचे नेतृत्व मोठय़ा प्रमाणात युरो-केंद्रित आहे. आतापर्यंत झालेले सर्व पोप युरोपचेच होते. पहिल्यांदाच तथाकथित तिसर्या जगातील कार्डिनल पोपपदी विराजमान झाले आहेत. पोप फ्रान्सिस यांनी स्वत:, तसेच त्यांच्या अज्रेंटिना देशाने व दक्षिण अमेरिका खंडाने गरिबी व शोषण अनुभवले आहे. त्यामुळे गोरगरीब, दुर्बल, दुर्लक्षित आणि शोषित हे पोप यांच्या नित्य चिंतनाचे विषय आहेत. त्यांच्यामुळे चर्चच्या भूमिकेत, दृष्टिकोनात व ध्येयधोरणात मूलभूत बदल होताना दिसत आहे. पोपचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी त्यांच्या भूमीचा अभ्यास करणे उद्बोधक ठरेल.
स्पेन आणि पोतरुगाल या पंधराव्या शतकात जगातील प्रबळ आर्थिक सत्ता होत्या. इ. स. ७ जुलै १४९४ रोजी दोन्ही देशांत टॉडेंसिलासचा करार झाला. त्यानुसार दोन्ही सत्तांनी जग आपसात वाटून घेतले. वॉस्को-डी-गामाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कालिकत येथे १४९८ ला नांगर टाकला. तिथे लॅटिन अमेरिकेत स्पॅनिश वसाहतवाद्यांनी मध्य व दक्षिण भागात पाय रोवले आणि पोतरुगीजांनी ब्राझील व्यापला. हाती तराजू घेऊन व्यापारी व बायबल घेऊन मिशनरी आले. त्यांना धर्मप्रसार करण्यासाठी मोकळे रान मिळाले. व्यापार्यांनी स्थानिकांना नागवले.
लॅटिन अमेरिकेत कॅथॅलिक धर्माचे प्राबल्य आहे. गेली अनेक दशके, मूठभर सत्ताधारी श्रीमंत आणि ऐश्वर्यमंडित, तर बहुसंख्य सामान्य जनता गरीब आणि भिकेकंगाल अशी परिस्थिती होती. साठच्या दशकात ख्रिस्ती विचारवंतांमध्ये नवविचाराचे वारे वाहू लागले. प्रभू येशू ख्रिस्ताचे उभे आयुष्य शोषितांच्या बाजूने गेले होते, हा धागा पकडून डाव्या विचारांच्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी ‘लिबरेशन थिऑलॉजी’ (मुक्तीचे तत्त्वज्ञान) हा सिद्धांत मांडला आणि गोरगरिबांच्या बाजूने पसंतीचा कौल दिला. सामान्य लोकांबरोबर धर्मगुरू आणि सिस्टर्सदेखील लढय़ामध्ये सामील झाले. शोषण करणार्यांचा पाडाव करण्यासाठी प्रसंगी हिंसेचाही वापर करता येईल, अशाप्रकारची जहाल मते काही धर्मगुरू व्यक्त करू लागले. काहींनी भ्रष्ट शासनाविरुद्ध चाललेल्या गनिमी लढय़ात भाग घेतला. पुरोगामी कृतिशील धर्मपंडितांनी कार्ल मार्क्सच्या सामाजिक विश्लेषण या अभ्यासपद्धतीचा अवलंब केल्यामुळे व्हॅटिकनच्या धर्मपीठाची त्यांच्याकडे वक्र नजर झाली.
पोप फ्रान्सिस यांचा उदय
पोप फ्रान्सिस यांच्या निर्मितीला लॅटिन अमेरिकेतील परिस्थिती, तेथील इतिहास, तेथील आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे. १९६0 ते १९९0 हा लॅटिन अमेरिकेसाठी अतिशय संघर्षाचा काळ होता. गनिमी लढाईच्या आणि निर्घृण हुकूमशहांच्या या काळात आजचे पोप फ्रान्सिस (पूर्वाश्रमीचे फादर बेर्गोलियो) हे अज्रेंटिनामध्ये जेज्वीट धर्मगुरू म्हणून कार्यरत होते. त्यांचे पूर्वज गरिबीमुळे नशीब काढण्यासाठी इटलीहून अज्रेंटिनाला आले. त्यांचे वडील रेल्वे कामगार होते आणि आई घरसंसार सांभाळीत होती. जॉर्ज बेर्गोलियो डिसेंबर १९६९मध्ये धर्मगुरू झाले व १९७३ला ते अज्रेंटिनातील सर्व जेज्वीट धर्मगुरूंचे प्रमुख झाले. याच काळात संपूर्ण लॅटिन अमेरिका व अज्रेंटिना राजकीय आगडोंबात होरपळून निघत होता. लोकलढय़ाला आशीर्वाद देणारे एल साल्वाडोर या देशाचे आर्चबिशप रोमेरो यांचा (१५ ऑगस्ट १९१७ - २४ मार्च १९८0) क्रूरकर्मा हुकूमशहांच्या लष्कराने बळी घेतला.
या वातावरणात फादर बेर्गोलियो कार्य करीत होते. ते गरिबांचे पोशिंदे होते. त्यांच्या न्याय्य हक्कांची त्यांना जाणीव होती; परंतु त्याचबरोबर त्यांचा हिंसेवर मुळीच विश्वास नव्हता. हिंसेत अधिक गंभीर हिंसेची बिजे दडलेली असतात, अशी त्यांची ठाम भूमिका होती. त्यामुळे हुकूमशहा आणि क्रांतिकारी यांच्यात समन्वय साधण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागली. २00१ मध्ये पोप जॉन पॉल यांनी बेर्गोलियो यांना ब्युएनॉस आयर या शहराचे कार्डिनल (उच्च धर्माधिकारी) नेमले. २00५ मध्ये अज्रेंटिनातील अखिल बिशपांच्या परिषदेचे ते अध्यक्ष झाले.
आपल्या आजूबाजूला पसरलेले दारिद्रय़ कार्डिनल बेर्गोलियो अनुभवत होते. धर्मगुरू हे लोकांचे सेवक आहेत, त्यांची राहणी साधी असावी व जीवनशैली गोरगरिबांसारखी असावी, असा त्यांचा आग्रह होता. या आचार-क्रांतीची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली. कार्डिनल म्हणून मिळालेल्या राजवाड्याचा त्यांनी त्याग केला व ते साध्या सदनिकेत राहायला गेले. उंची कार बाजूला सारून, ते शहरातील प्रवासासाठी बसचा व मेट्रोचा वापर करू लागले. (ही त्यांची धर्मगुरू झाल्या दिवसापासूनची जीवनपद्धती होती). ते झोपडपट्टीत जाऊन लोकांसमवेत सभा घ्यायचे, त्यांनी वाढलेली मीठ-भाकर गोड मानून खायचे; त्यामुळे ‘गोरगरिबांचे धर्मगुरू’ म्हणून ते प्रसिद्ध झाले. वास्तविक, सर्व धर्मांतील सर्व धर्मगुरूंनी साधेपणाचेच जीवन व्यथित केले पाहिजे. धर्मातून त्यागाची भावना निघून जाते; तेव्हा तो धर्म म्हणजे खारटपणा हरवलेल्या मिठासारखा होत असतो. आजच्या पंचतारांकित अध्यात्मात अशा मिठाची धन झाली आहे, असे अनेक ठिकाणी दिसून येते. पोप फ्रान्सिस हे मूठभर अपवादांपैकी एक आहेत.
साधी राहणी
पोप हे व्हॅटिकन या राज्याचे प्रमुख असतात. त्यांना इटालियन सरकार राजनैतिक शिष्टाचाराने वागवीत असते. पोपपदी निवड झाल्यावर, दुसर्याच दिवशी त्यांनी वसतिगृहामध्ये जाऊन आपले बिल चुकते केले व स्वत: आपले सामान उचलून आणले. व्हॅटिकनमधील सर्व अधिकार्यांसाठी तो मोठय़ा रिश्टरचा धक्का होता. तिसर्या दिवशी त्यांनी साध्या बसमध्ये बसून, व्हॅटिकनजवळील एका चर्चला भेट दिली व परत येताना ते काही वेळ ड्रायव्हरच्या शेजारी बसले.
पोप झाल्यावर दोनच आठवड्यांनी गुरुवार २८ मार्च २0१३ रोजी (गूड फ्रायडेच्या आदल्या संध्याकाळी) ते रोमच्या तुरुंगात गेले. तिथे प्रार्थना करून त्यांनी निवडक कैद्यांचे पाय धुतले. त्यांच्यात एका मुसलमान गुन्हेगार तरुणीचा समावेश होता. चर्चच्या दोन हजार वर्षांंच्या इतिहासात असे कधी झाले नव्हते! अनेक सनातनी मंडळींच्या भुवया उंचावल्या गेल्या. काहींनी पोपवर टीकाही केली; परंतु पोपनी स्त्रियांना समान स्थान दिले म्हणून अनेकांनी त्यांची वाहवा केली. १७ डिसेंबर २0१३ रोजी पोपचा वाढदिवस होता. त्यांनी आपल्या सेक्रेटरीला रोमच्या रस्त्यावर पाठविले आणि चार-पाच अनामिक, बेघर भिकार्यांना सन्मानाने बोलावून व्हॅटिकनमध्ये आणले आणि त्यांच्याबरोबर ब्रेकफास्ट घेतला. जुलै २0१३ ला ते अज्रेंटिना दौर्यावर गेले होते. २५ लाख लोकांनी त्यांचे स्वागत केले. विमानात चढता-उतरताना, पोपनी आपली बॅग सेक्रेटरीकडे न देता स्वत: हाती घेतली. या सार्या गोष्टी प्रतिकात्मक आहेत. सर्व उच्चपदस्थांसाठी तो धडा आहे. अनेकदा शब्दाचाही वापर न करता, प्रभावी प्रवचन कसे द्यावे, ही कला पोप यांना अवगत झाली आहे.
व्हॅटिकन हे कॅथलिक चर्चचे धर्मपीठ आहे. गेल्या काही वर्षांंत तिथेही धूळ साचली आहे. जगाला प्रवचन-पाठ देण्यापूर्वी पोपनी आपले घर स्वच्छ करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी त्यांनी जगभरातील नामवंत कार्डिनल्सचे अष्टप्रधान मंडळ स्थापन केले आहे. (त्यात मुंबईचे कार्डिनल ऑझवल्ड ग्रेशस यांचा समावेश आहे.) व्यवस्थेत मूलभूत बदल सुचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. व्यवस्था ही एका दिवसात बदलत नाही. त्यासाठी वैचारिक भूमिका तयार करावी लागते आणि व्यवहार्य मार्ग सुचवावे लागतात. ते काम अष्टमंडळ करीत आहे.
व्हॅटिकन बँक ही चर्चच्या मालकीची आहे. आर्थिक व्यवहार आले, की घोटाळे आलेच. व्हॅटिकन बँकेत तेच घडले. धनाचा लोभ आध्यात्मिक माणसालाही भ्रष्ट करू शकतो, हे पाहून पोप व्यथित झाले. अधिकारग्रहण करताच, त्यांनी तडकाफडकी तीन धर्माधिकार्यांना बाहेरची वाट दाखविली व त्यांचे तनखे बंद केले. र्जमनीतील लिंबुर्ग शहरातील बिशप फ्रांज पीटर यांनी चार कोटी तीस लाख डॉलर्स खर्च करून आलिशान महाल बांधलेला आहे. त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत आहे. पोप फ्रान्सिस यांनी त्यांना व्हॅटिकनला बोलावून घेतले आणि त्यांना ताबडतोब बिशपपदावरून दूर सारले. आज पोप लोकप्रियतेच्या कळसावर आहेत. अर्थात्, लोकप्रियतेसाठी ते पावले उचलत नाहीत, तर प्रभूख्रिस्तांशी निष्ठावंत राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या प्रयत्नाला समाजातील सर्वच क्षेत्रांमधून पाठिंबा मिळत आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या जीवनावर डझनवारी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘टाईम’ मासिकाने त्यांना ‘मॅन ऑफ दि इयर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आज सर्व क्षेत्रांत नेतृत्वाचा दुष्काळ दिसून येतो. योग्य नेतृत्वाअभावी समाज दिशाहीन झाला आहे. आर्थिक मंदी, नैतिकतेचा र्हास, मूल्यांची तोडमोड, अधिकाराचा गैरवापर, सर्वंंकष भ्रष्टाचार, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रांतील काहींचे संशयास्पद वर्तन ही आजच्या समाजाची दु:खे आहेत. ‘सारेच दीप कसे मंदावले आता,’ अशी परिस्थिती निर्माण झाली असता, पोप फ्रान्सिससारखा एक देदीप्यमान तारा आज क्षितिजावर झळकत आहे.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)
from Lokmat Marathi News : Manthan-Main (वैचारिक मंथन-मुख्य)

No comments:
Post a Comment