ऑनलाइन टीम
क्वालालंपूर, दि. १५ - गायब झालेल्या विमानाचा शोध घेण्याचा अथक प्रयत्न करण्यात येत असून विमानाचे अपहरण झाले का या शक्यतेचाही शोध घेण्यात येत असल्याचे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी सांगितले. आठ मार्च रोजी गायब जालेल्या या विमानातल्या सगळ्या कर्मचा-यांच्या तसेच प्रवाशांच्या पार्श्वभूमीची कसून चौकशी करण्यात येत असून त्यासाठी संबंधित देशांनाही सहभागी करून घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
गेले आठ दिवस १२ देशांची ४२ जहाजे व ३९ विमाने एमएच ३७० या विमानाचा शोध कझाकस्तानपासून ते अंदमानपर्यंत घेत आहेत, परंतु समुद्रामध्ये कुठेही या विमानाचा ठावठिकाणा लागलेला नाही. इंडोनेशियाकडून बीजिंगकडे निघालेल्या या विमानाचा संपर्क दोन तासांनी तुटला, त्यानंतर म्हणजे आठ मार्चला रात्री ८ (मलेशियाची वेळ) नंतर काहीही समजलेले नाही. या प्रवाशांमध्ये १५३ चीनी, ३८ मलेशियन
७ ऑस्ट्रेलियन, ५ अमेरिकी व ५ भारतीय प्रवासी होते. या विमानामधल्या पायलटनी, अन्य कर्मचा-यांनी वा प्रवासांपैकी कुणीतरी हे विमान पळवले, संपर्कयंत्रणा बंद पाडली असा संशय आहे.
हे विमान ठरलेल्या मार्गापासून उलट्या दिशेने वळवण्यात आल्याचे व त्यानंतरच संपर्क तुटल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यामुळेच शोधमोहीमेसोबतच अपहरणाच्या शक्यतेचीही कसून चपासणी करण्यात येत आहे.
या विमानाच्या मार्गावरील सागराचा शोध गेला आठवडाभर सुरू असून कुठेही हे विमान समुद्रात पडल्याचे आढळलेले नाही. सगळ्या रडारवरून विमान गायब कसे झाले, वैमानिकाशी संपर्क का तुटला, ब्लॅक बॉक्सचे काय झाले, अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांचा मागोवा तपास पथके घेत होती. परंतु हाती काहीही लागले नसल्याने या विमानाचे अपहरण करण्यात आले असावे असा कयास बांधण्यात येत आहे.
विमानाचे अपहरण कुणी केले असावे याबाबत संदिग्धता असून काही चिनी तज्ज्ञांच्या मते उघूर प्रांतातल्या फुटीरतावाद्यांनी अपहरण केले असावे असा संशय आहे. दोन आठवड्यांपूर्वी उघूर दहशतवाद्यांनी चाकूहल्ला करत जवळपास २८ चिनी नागरिकांना ठार केले होते. गेले काही वर्षे उघूर प्रांतातल्या दहशतवाद्यांचा प्रश्न चिघळला असून त्यांना पाकिस्तान मदत करत असल्यचा आरोपही होत होता.
बेपत्ता झालेल्या विमानामध्ये बहुतांश प्रवासी चिनी होते, त्यामुळे उघूर प्रांतातल्या दहशतवाद्यांनी या विमानाचे अपहरण केले असावे असा संशय आहे.
अज्ञात विमान, (शोध घेणार्यांच्या मते मलेशियाचे एमएच ३७0 हेच विमान) मलय द्वीपकल्पावरून अंदमान बेटाकडे वळविण्यात आले. तर अमेरिकेच्या मते हे विमान सध्या शोध चाललेल्या परिसरापासून लांब नेण्यात आले; पण उड्डयन तंत्रज्ञांनी या दोन्हीही शक्यता नाकारल्या आहेत. बोईंग ७७७-२00 हे विमान कोणालाही न कळता लांब नेणे शक्यच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मलेशियाने आज या विमानाचा शोध हिंदी महासागराकडे घेण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून रडार माहितीही मागविण्यात आली आहे. भारताची सहा विमाने व अलीकडेच विकसित केलेले टेहळणी विमान पी-८१ सध्या या शोधात सहभागी आहे.
from Lokmat Marathi News : Main-Main (मुख्य-मुख्य) http://ift.tt/1oWiX0d

No comments:
Post a Comment