किशोर बागडे
परदेशात विजयाची पाटी कोरी का राहते? पराभवाला सामोरे जाताना विजयी वाटेवर परतायचे कसे, हा प्रश्न भारतीय संघाला भेडसावतो आहे. त्या पार्श्वभूमीवर संघाच्या कामगिरीचे मूल्यमापन..
पायाभरणी भक्कम नसेल, तर इमारत कोसळणारच. टीम इंडियाचेही अलीकडे असेच झाले आहे. दिग्गजांच्या नवृत्तीनंतर त्यांची जागा घेणारे खेळाडू पुढे आले नाहीत. जे आले, ते झटपट क्रिकेटमध्ये चमकले; पण कसोटीत हिरवीगार विकेट पाहून त्यांचीही विकेट पडली. टीम इंडिया ३ वर्षांपासून अपयशाच्या गर्तेत अडकली. ‘दादा’ मानला जाणारा भारतीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या दौर्यांत पराभूत होऊन आला.
आता बांगलादेशात टी-२0 वर्ल्डकप खेळण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेजारच्या बांगलादेशातील परिस्थिती भारतीय खेळाडूंना नवी नाही. २00७च्या ‘चॅम्पियन’ भारताला इभ्रत शाबूत ठेवण्यासाठी ही अखेरची संधी असेल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये; पण चॅम्पियन होण्याइतपत यशस्वी व्हायचे झाल्यास गोलंदाजांनीच चमत्कार करायला हवा.
विजयी वाटेवर यायचे कसे, याचा विचार संघ व्यवस्थापनाला सारखा भेडसावतो आहे. परदेशात विजयाची पाटी का कोरी राहिली? याचे कारण कमकुवत मारा आणि बेभरवशाची फलंदाजी हे आहे. टी-२0मध्ये चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आटापिटा सुरू आहे. एकापाठोपाठ एक मालिका गमावल्याने क्रमवारीत घसरण झाली तो भाग वेगळा. चुका सुधारण्यापेक्षा थकवा जाणवत असल्याची तक्रार करून खेळाडू जबाबदारी झटकतात. द. आफ्रिका, न्यूझीलंड दौर्यांत कसोटी आणि वनडे सामन्यांत काय दाणादाण उडाली, हे क्रिकेट चाहत्यांना ठाऊक आहे. आफ्रिकेने १-0 आणि न्यूझीलंडने ४-0ने धुव्वा उडविला. आशिया चषकातही विश्वविजेत्या भारताची त्रेधातिरपीट झाली. पाक आणि लंकेने तोंडाला फेस आणला. दुबळ्या अफगाण आणि बांगला संघांवर कोहलीचा हा संघ विजय मिळवू शकला, हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
गोलंदाजी हीच टीम इंडियाची खरी डोकेदुखी आहे. विशेषत: एकदिवसीय लढतीत आपल्याविरुद्ध अनेक संघ सातत्याने ३00च्या वर धावा ठोकत आहेत. विजयाचा पाठलाग करताना मात्र दमछाक होते. गोलंदाजांना कुठल्या समस्या जाणवतात कुणास ठाऊक? पण, त्यांच्या मार्यात भेदकताच दिसत नाही. गोलंदाजी खराब आहे, असे कुणी म्हणणार नाही; पण आखलेले डावपेच चपखलपणे लागू होतील, असा मारा नाही. गोलंदाजांकडे यॉर्कर किंवा मंदगतीचा चेंडू टाकण्याचे कौशल्य नाही. शस्त्रसाठा जितका जास्त, तितके शिताफीने युद्ध जिंकता येते. नेमके हेच धोरण गोलंदाज विसरलेले दिसतात. प्रतिस्पर्धी फलंदाजांना घाम फोडू शकेल, असे ‘व्हेरिएशन’ हवे. शस्त्रे धारदार करण्यासाठी तासन् तास नेटवर घाम गाळण्याची तयारी नाही. सरावाची तयारी नसेल, तर मारादेखील धारदार होऊच शकणार नाही. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजीत उत्तम ‘फिनिशर’ ठरतील, असे खेळाडू संघात आहेत; पण सामना हमखास जिंकू शकतील, असे गोलंदाज नसल्याने अलीकडे तोंडघशी पडण्याची वेळ वारंवार येत आहे.
२00७मध्ये टी-२0 विश्वचषकाचे जेतेपद मिळाले तेव्हा टीम इंडिया या प्रकारात फारसा अनुभवी नव्हता; पण क्रिकेट विश्वाला भुरळ घालणार्या आणि पैशाची गंगा वाहवत आणणार्या जगातील सर्वांत श्रीमंत आयपीएलची कल्पना याच झटपट क्रिकेटने दिली. या प्रकाराचा पुरेसा अनुभव मिळाल्यानंतरही, भक्कम संघ उतरविल्यानंतरही नंतरच्या तिन्ही टी-२0 विश्वचषकांत भारताची घसरगुंडीच झाली आहे. २00७मध्ये गौतम गंभीरने ठोकलेल्या ७५ धावांच्या बळावर पाकला अंतिम सामन्यात ५ गड्यांनी नमवून मिळविलेले जेतेपद असो, युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात ६ षटकार मारण्याची केलेली ऐतिहासिक कामगिरी असो किंवा भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीचे पुढे आलेले नेतृत्व असो; आनंद देणार्या या घटना एकाच वेळी घडल्या. इरफान पठाण व आर. पी. सिंह या २ डावखुर्या मध्यम-जलद गोलंदाजांची विस्मयकारी कामगिरी जेतेपद मिळविण्यात महत्त्वाची ठरली होती.
दोन वर्षांनंतर काय झाले? सुपर एटमध्ये धडक देणार्या भारताला आफ्रिका, विंडीज आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध तिन्ही सामने गमवावे लागल्याने जेतेपदाचा मुकुट वाचविण्यात अपयश आले.
सेहवाग एकाही सामन्यात चमक दाखवू शकला नाही; शिवाय स्पर्धेच्या मध्येच खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेरही पडला. इंग्लंडमधल्या उसळी घेणार्या खेळपट्टय़ांवर ‘बाउन्सर’ने भारतीयांचा घात केला.
विंडीजमधील विश्वचषकातही अपयशाची पुनरावृत्तीच झाली. ऑस्ट्रेलिया, लंका आणि विंडीजकडून सपाटून मार खाताच भारत स्पर्धेबाहेर पडला होता. २0१२च्या टी-२0 विश्वचषकातही नवे काही घडले अशातला भाग नाही. आयपीएलचा अनुभव आणि अधिक टी-२0 सामने खेळल्यानंतरही संघ सुधारला नव्हता. ‘सुपर ८’च्या घोडदौडीत द. आफ्रिका आणि पाक यांना नमविणार्या भारताला ऑस्ट्रेलियाकडून जो दारुण पराभवाचा फटका बसला; त्यामुळे उत्तम धावसरासरीच्या आधारे पाकच्या उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला आणि भारताला मायदेशी परतावे लागले होते. पण, संघाच्या जमेची बाब अशी, की याच स्पर्धेत संघाला विराट कोहली नावाचा नवा चेहरा गवसला. ५ सामन्यांत १८५ धावा ठोकणार्या विराटने युवी, धोनी, सेहवाग, गंभीर यांच्या पंक्तीत स्थान पटकावले. तेव्हापासून विराटची तोफ सतत गर्जतच आहे. दुसरीकडे, संघाच्या अपयशाची घसरण मात्र थांबण्याची चिन्हे नाहीत.
यंदाच्या टी-२0 विश्वचषकात भारत कठीण गटात आहे. सर्वांत बलाढय़ आव्हान राहील ते चॅम्पियन विंडीजचे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आहेतच. पाचपैकी दोनच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने भारताला चारपैकी किमान तीन सामने जिंकावेच लागतील. विंडीज, ऑस्ट्रेलिया आणि पाक या संघांत फलंदाज आणि गोलंदाजांची उणीव नाही; पण भारताकडे त्यांचा मुकाबला करणारे खेळाडू आहेत का? त्यादृष्टीने फलंदाजी, गडी बाद करू शकणारी गोलंदाजी आणि त्याला साजेशी क्षेत्ररक्षणाची सक्षम यंत्रणा उभारण्यास व्यवस्थापन सज्ज आहे, असे वाटत नाही.
सुनील गावसकर यांनी मध्येच बॉम्बगोळा टाकला. त्यांनी डंकन फ्लेचर यांना रडारवर घेतले. फ्लेचर कोच झाल्यापासून भारत विदेशात सतत परभावाच्या गर्तेत सापडत गेला हे सत्य आहे; पण पराभवाचे वेिषण करताना मात्र धोनीच्या माथी अपयशाचे खापर फोडले जाते. दोष धोनीच्या वाट्याला देऊन ‘धोनी हटाव’चा नारा दिला जातो. फ्लेचर यांच्याबाबत मात्र मौन बाळगण्याचे धोरण सुरू आहे. गावसकर यांनी त्यांच्यावर अचूक नेम साधला. पराभवांना धोनी जितका जबाबदार असेल, तितकाच दोष कोचचादेखील आहे. फ्लेचर सतत शांत राहिले. ते मोठय़ा गप्पा करीत नसल्याने पाठोपाठच्या पराभवांनंतरही त्यांच्यावर ३ वर्षांत टीका झालेली नाही. ग्रेग चॅपेल बोलण्यात पटाईत होते; पण कामात कमी पडताच त्याची ताडकन उचलबांगडी झाली होती, हा पूर्वानुभव आहे.
फ्लेचर यांची उपयुक्तता किती, हा प्रश्न भारतीय चाहत्यांना पडणे स्वाभाविक आहे. ते एकमेव असे विदेशी कोच आहेत, की ज्यांचा संघाला जराही उपयोग झालेला नाही. कुठल्या तरी एका क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे, असेही नाही. ते केवळ नोकरी करीत आहेत, हा भाग वेगळा. ते आल्यापासून भारताने जे ३0 कसोटी सामने खेळले, त्यांत १२ जिंकले आणि १२ गमावले. ८0 वनडेपैकी ४५ आणि १८ टी-२0 पैकी ८ सामने संघाला गमवावे लागले, हा कोचचा लेखाजोखा आहे. मग, त्यांच्याऐवजी दुसरा कोच आणणे का योग्य ठरू नये? गावसकर यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘देशी’ कोच योग्य. त्यांनी राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांचे नावही सांगून टाकले. ‘मी स्वत: लायक आहे,’ हे सांगण्यास मात्र ते विसरले. भारतीय खेळाडूंची मानसिकता ओळखणारा आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देणारा भारतीय कोच संघाला हवा आहे. याबाबत कपिलचे मत असे, की विदेशी प्रशिक्षकांसोबत सर्वांत मोठी अडचण असते ती संवादाचीच! संवाद नसेल, तर पुढचे काम कठीण होते. पण, कोचच्या नावाची सूचना करणे आणि नेमणूक होणे, यांत फरक आहे. बीसीसीआयच्या अडचणीत भर पाडणारा प्रशिक्षक संघाला नको असतो. त्यांना लाभदायी ठरणारा आणि मान हलविणारा प्रशिक्षक हवा. त्यामुळेच ज्याच्या नावाची चर्चा किंवा हवादेखील नसते, असा प्रशिक्षक बीसीसीआयला अलगद सापडतो. मग गावसकर कितीही म्हणत असतील, की राहुल द्रविड हा भारतीय संघाचा प्रशिक्षक असावा, त्याचा लोक आदर करतात, तो अनुभवी आहे. बीसीसीआयच्या राजकारणात सर्व बाबी गौण ठरतात. गावसकर यांना जगातील सर्वांत आव्हानात्मक खेळपट्टय़ांवर खेळण्याचा अनुभव आहे. क्रिकेटचे ते जाणकार आहेत. तंत्र माहिती आहे. ते बोलले, की क्रिकेटविश्व त्यांचे म्हणणे ध्यानात घेते, तरीही गावसकर यांनी कोचच्या शर्यतीतून स्वत:ला बाहेर का ठेवले? भारतीय संघाला गेल्या ३ वर्षांत विदेशी खेळपट्टय़ांवर जो वाईट अनुभव आला, त्यातून बाहेर काढण्यासाठी गावसकर यांची संघाला गरज आहे; पण अंतर्गत राजकारण आणि अर्थकारण यांत ते पडू इच्छित नसावेत. त्यांना स्वत:च्या र्मयादा ठाऊक आहेत. विश्वचषकाच्या तयारीसाठी टीम इंडियाला घरचाच कोच मिळावा, अशी तळमळ मात्र त्यांच्या बोलण्यात आहे. अनुभवी खेळाडूंची क्रिकेट विकासासाठी मदत घेऊ, असे म्हणणे आणि प्रत्यक्षात तसे करणे, या भिन्न गोष्टी आहेत.
भारतीय क्रिकेटचा विकास करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते गावसकर यांच्या विधानाला किती महत्त्व देतात, यावर आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाची तयारी विसंबून असेल.
(लेखक लोकमत नागपूर आवृत्तीमध्ये
वरिष्ठ उपसंपादक आहेत)
from Lokmat Marathi News : Manthan-Main (वैचारिक मंथन-मुख्य)

No comments:
Post a Comment