- अशोक राणे
बोरिस ल्हेबिनिकोव्ह आणि अलेक्सी पोपोग्रेबस्की या जोडगोळीनं लिहिलेला, दिग्दर्शित केलेला रोड मूव्हिज प्रकारातील हा त्यांचा पहिलाच चित्रपट! परंतु, पहिला वाटू नये इतका चित्रपटीय भाषेची प्रगल्भता दाखवणारा.! मॉस्को - कोकटेबल प्रवासाच्या आसपासचा भलाथोरला अवकाश हा चित्रपट आपल्या कवेत घेतो.
दूरवर आडवा-उभा पसरलेला जवळपास ओसाड प्रदेश. सापासारखी पुढे सरकणारी मालगाडी दुरूनच दिसणारी. मग जवळून दिसणारी. आता मालगाडीचा आवाज स्पष्टपणे जाणवणारा. मग ती अधिकच जवळून दिसते. मग दिसत राहतो पुढे सरकत राहणारा एक डबा. त्याचं दार उघडंच. समोर दिसतात दोघं-तिशीतला बाप आणि दहा-अकरा वर्षांचा पोरगा. प्रचंड आवाज करीत गाडी थांबते.
‘‘सफरचंद खायचंय?’’
पोरगा प्रश्नार्थक नजरेने बापाकडे पाहतो. बाप बाहेरच्या दिशेने बोट दाखवतो. समोर सफरचंद लगडलेली झाडं दिसतात. बाप ताडकन उठतो आणि धावत जातो. सफरचंद तोडून शर्टाचा ओचा करून त्यात टाकतो. इकडे गाडी हलते. पोरगा घाबरतो. बापाचं सफरचंद तोडणं चालूच आहे. मग त्याचंही लक्ष जातं आणि तो गाडीच्या दिशेने धावत सुटतो. चालती गाडी पकडताना सगळी सफरचंदं खाली पडतात. दोनच शिल्लक राहतात. दोघं पुन्हा मघासारखे बसलेले.. सफरचंद खात!
हे बापबेटे निघालेले कोकटेबलला! युक्रेनच्या दक्षिणेला असलेल्या काळ्या समुद्राच्या किनार्यावर वसलेलं हे गाव! मॉस्को ते कोकटेबलचा प्रवास जवळपास हजार मैलांचा आणि खिशात दमडा नाही.
दारूच्या आहारी गेलेला हा माणूस. पत्नीचंही अलीकडेच निधन झालंय. त्यातच त्याची नोकरी गेलीय. त्यामुळे सर्व प्रकारच्या समस्या आणि त्याहीपेक्षा अपराधी भावनेने ग्रासलेला. तिकडे कोकटेबलला त्याची म्हातारी आत्या. पोराला घेऊन तो तिथे निघालाय. नव्याने आयुष्य सुरू करायला. कोकटेबल, त्याच्यासाठी एक प्रकारची स्वप्ननगरी.. त्याचं एक ड्योराडो! पोराला त्याने एवढंच सांगितलंय, की कोकटेबलला त्याला सीगल पक्षी पाहायला मिळतील. पोराचं सिगलचं कुतूहल.. ते पाहण्याची अनावर होत जाणारी ओढ.. आणि प्रवास थांबत थांबत चाललेला. पहिल्यांदा थांबतो, जेव्हा रेल्वेचा गार्ड त्यांना गाडीतून उतरवतो. मग मैलोन्मैल पायपीट. चालता चालता पोरगा सिगलविषयी नाना प्रश्न विचारीत राहतो.
थकूनभागून कुठे तरी गवतात ते पहुडलेले, तर कुठून तरी एक बंदूकधारी म्हातारा उगवतो. या दोघांना घर दुरुस्तीसाठी घेऊन जातो. काही दिवस उपासमार टळते. पण, हा पुन्हा दारूत बुडतो. तशातच म्हातार्याला याचा संशय येतो, की यानं चोरी केलीय. तो गोळ्या झाडतो. पोरगा जखमी बापाला घेऊन कसाबसा पळ काढतो. म्हातार्याच्या घरापासून दूर आल्यावर पोरगा बापाला रागातच सुनावतो.
‘‘कळायला हवं होतं तुम्हाला, म्हातारा कसा आहे ते.? मला आधीपासूनच तो खुनशी वाटत होता. खुनशी आणि स्वार्थी.. एवढे दिवस काम केलं आणि अखेर दमडाही नाही मिळाला. आणखी किती दिवस लागतील कोकटेबलला पोहोचायला.?
तो बोलतोय, पण बाप बेशुद्ध होऊन पडलेला. तो आसपास पाहतो. जवळपास ना कुठे माणूस.. ना वस्ती.! तो कसंबसं बापाला ओढत पुढे नेत राहतो. एवढय़ात कुठून तरी एक गाडी येते. गाडी चालवणारी तरुण स्त्री या दोघांना पाहून थांबते. गाडीत घेते आणि निघते.
एक गाव येतं. ती मुलाच्या मदतीने त्याच्या जखमी बापाला घरात आणते. त्याच्या तोंडावर पाणी मारते. मग त्याचा रक्ताने माखलेला शर्ट फाडून जखम धुते. एक बॉक्स आणते. तिचं सारं एका वेगात चाललं आहे. पोरगा बापाजवळ बसून पाहत राहतो. मग ती दंडात घुसलेली गोळी काढते. जखमेला औषध लावते. व्यवस्थित ड्रेसिंग करते. त्याला नीट झोपवते. पांघरूण घालते. पोरगा तिची सारी लगबग पाहत राहतो. मग तिचं त्याच्याकडे लक्ष जातं. तिच्या चेहर्यावर आस्थेवाईक भाव. ती त्या पोराला जवळ घेते.
‘‘घाबरू नकोस. बरे होतील ते. थोडा आाराम करूदे.’’
ती मग त्याला खायला देते. खाता खाता तो तिचं निरीक्षण करीत राहतो. तिच्याही ते लक्षात येतं. तिला त्याची गंमत वाटते. पण, ती काहीच बोलत नाही.
तो मग घराबाहेर येतो. प्रथमच सभोवतालचा परिसर पाहतो. आकाशात पक्षी दिसतात आणि मग तो उदास होतो. आत पाहतो. गाढ झोपलेला बाप दिसतो. कोकटेबलला पोहोचायला अशानं आणखीनच उशीर होणार. तो उगाचच इकडेतिकडे फिरत राहतो.
रात्र होते. तिनं दिलेलं सूप घेत ढवळत बसला आहे. इथे बाप जागा झालेला. ती त्याला आधार देऊन बसवते. तो तिच्याकडे, घराकडे आणि मग आपल्या पोराकडे पाहतो.
‘‘मी डॉक्टर आहे. तुमच्या दंडातली गोळी मीच काढली. बरं वाटतय ना आता? थोडं ऊनऊन सूप घ्या. आणखी बरं वाटेल.’’
ती त्याला सूपचं बाऊल देते. त्याला सहजपणे हालचाल करता येत नाही. ती त्याला मदत करते आणि मग सरळ त्याच्या जवळ बसून त्याला सूप भरवू लागते. इकडे पोरगा अजून तसंच सूप ढवळत तिला न्याहाळतो आहे. त्याच्या डोक्यात खूप काही तरी चाललेलं असावं. त्याच्या नजरेवरून स्पष्टपणे ते जाणवतं.
सकाळ होते. ती हातात एक घमेलं घेऊन मागील दारी येते. घमेल्यात कपड्यांचे पिळे असतात. ती दोरीवर ते वाळत घालते. हा पोरगाही तिथेच काही अंतरावर आहे. त्याने मागे काही तरी दडवले आहे आणि तिच्याकडे तसंच पाहतो आहे. तिला अर्थातच ते जाणवतं. त्याचं कालपासूनचं हे असं पाहणं आणि काही तरी मागे लपवणं. ती एकेक करीत कपडे वाळत घालीत आहे. ते सर्व या बापलेकाचेच आहेत. तिचं आटपतं आणि ती निघते. एवढय़ात तो पोरगा मागे लपलेलं पुढे करतो. ती असते त्याची चड्डी. तो उड्या मारीत दोरीवर वाळत टाकायला जातो. हात पोहोचत नाही. आणखी एकदा प्रयत्न करतो. काही तरी कामात असल्याचा बहाणा करीत चोरून त्याच्याकडे पाहणारी ती मग त्याचं लक्ष जाणार नाही अशा बेताने, त्याने उडी मारताच दोरी अलगद खाली करते. चड्डी दोरीवर. तिला हसू येतं. बाकी सारे कपडे आपण धुतले; परंतु चड्डी मात्र त्याची त्याने धुतली.
दिवसभर तो घराच्या आसपास वावरत अधूनमधून आत पाहत राहतो. तिनं याच्या बापाला तत्परतेनं हवं नको ते देणं, आस्थेने आणि त्याहीपेक्षा लाघवीपणे त्याची सेवा करणं.. तो टिपतोय सारं.. जे दिसतंय, त्याचा मनातल्या मनात अर्थ लावतोय.
बापाला केवळ बरंच वाटलेलं नाही, तर खुललाय. वेगळाच दिसतोय. आपण कुणा परक्याच्या घरी आहोत, ही कुणी परकी बाई आहे, या सगळ्याचा त्याला पार विसर पडलाय. जणू हे सारं आपलंच आहे, इतका तो रमलाय. रात्र होते. मध्यरात्री कसल्या तरी आवाजाने हा जागा होतो. बापाच्या खोलीत पाहतो. तो अवाक होतो.
सकाळी ती बाई सांगत येते,
‘‘पोरगा नाही त्याच्या खोलीत. कुठेच नाही.’’
दोघं बाहेर येऊन शोधाशोध करतात. पोरगा कुठेच नसतो.. आणि मग दिसतो हायवेवरचा एक ट्रक. त्यात ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला हा पोरगा. ट्रक धावत राहतो. पोरगा बाहेरचा बदलत जाणारा परिसर पाहत राहतो. एका ठिकाणी ट्रक थांबतो.
‘‘हा बाजूचा रस्ता कोकटेबलला जातो.
हा उतरतो. उड्या मारीत निघतो. कोकटेबल दिसतं. त्याची ओळख पटते सीगल दिसतात तेव्हा. तो धावत जाऊन एक सीगल पकडतो. मग त्याला सोडून देतो आणि एका बारीकशा टेकडीवरून समोरचा काळा समुद्र पाहत राहतो. कौटुंबिक, विनोदी, रहस्य अशा चित्रपटांच्या अनेक पठड्या असतात. त्यातली एक म्हणजे ‘रोड मूव्हिज!’ कोकटेबल हा याच पठडीतला. बोरिस ल्हेबिनिकोव्ह आणि अलेक्सी पोपोग्रेबस्की या जोडगोळीनं लिहिलेला, दिग्दर्शित केलेला त्याचा पहिलाच चित्रपट! परंतु, पहिला वाटू नये इतका चित्रपटीय भाषेची प्रगल्भता दाखवणारा.! रोड मूव्हिज प्रकारात एक धोका असतो. त्यात प्रवास असतो. बदलता प्रदेश, बदलतं हवामान, बदलतं लोकजीवन त्यात वळणावळणावर दिसत राहतं. दिग्दर्शक त्याच्या मोहात पडून आपल्या कथेचा प्रवास थांबवतो. हे घडतं बर्याच वेळा. ताजं उदाहरण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट ‘हायवे’! ‘कोकटेबल’मध्येही थोडंफार तसं झालंय.
२00३च्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा दाखवला गेला. मी तिथेच तो पाहिला. चित्रपट समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ज्युरीचा मी सदस्य होतो. महोत्सवाच्या पाचव्या दिवशी ‘कोकटेबल’चा पहिला खेळ झाल्यापासून अखेरपर्यंत सर्वांच्या तोंडी त्याचंच कौतुक होतं. सर्वत्र एकाच वाक्यात बोललं जात होतं, ‘वाह! किती छान चित्रपट!’ या वाक्यापुढे आणखी एक शब्द होता. ‘पण..’ याचा अर्थ इतकाच होता, की इतका सुंदर, आशयघन चित्रपट, पण तेवढी लांबी कमी असती तर. आणि चित्रपट होता अवघ्या पावणे दोन तासांचा! आणि तरीही मुख्य ज्युरींनी आणि आमच्याही ज्युरींनी त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रथम पुरस्कार दिला. कारण, रोड मूव्हिज प्रकारच्या चित्रपटात वर नमूद केलेल्या बदलत जाणार्या भवतालाचा कथेवर, त्यातील व्यक्तिरेखांवर खोलवर परिणाम होत जातो. बरा की वाईट, हा मुद्दा गैरलागू. ‘कोकटेबल’मध्ये हे एका सहजतेने घडतं. जिथे खूप सीगल आहेत, तो प्रदेश पाहण्याची वाढती ओढ असणार्या मुलाला दिसत जणारं भोवतालचं जग, त्याचं त्यानं केलेलं निरीक्षण, त्याला वाटत जाणारं कुतूहल, त्यानं त्याच्या परीनं अर्थ लावत जाणं आणि अखेरीस आपला मार्ग आपणच निवडायला हवा या निर्णयाप्रत येणं हे सारं एका स्वाभाविकतेनं आणि म्हणूनच तरलतेनं येतं. इथे दोन मोजकेच प्रसंग दिलेत; परंतु कथेत आणखी काही प्रसंग आहेत. त्या त्या प्रसंगापुरती येणारी पात्रं आहेत आणि त्यांचंही याच सहजतेनं कथेत आपलं योगदान देणं आहे.
चित्रपट रशियन आहे आणि जरी तो पंचविशीच्या तरुणांनी केलेला आहे, तरी त्यावर स्टॅलीनच्या क्रौर्याची काळी छाया आहे. म्हणजे काळाचा एक असा पट आहे, की तो या मॉस्को - कोकटेबल प्रवासाच्या आसपासचा भलाथोरला अवकाश कवेत घेतो. एक संस्मरणीय रोड मूव्हिज पहिल्यांदा आनंद देतो. लांबी वाढल्याचा किंचितसा दोष असला तरीही.
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)
from Lokmat Marathi News : Manthan-Main (वैचारिक मंथन-मुख्य)

Bagikan
रोड टू कॉकटेबल
4/
5
Oleh
Anonymous